MSBTE Notification 2021 (OUT) Check Exam Fee Summer Schedule, Exam Date

MSBTE Notification 2021 (OUT) Check Exam Fee Summer Schedule, Exam Date: उपरोक्त संदर्भानुसार मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे वेळापत्रक प्रदर्शित केले आहे. त्यामध्ये उन्हाळी-२०२१ परीक्षा अर्ज भरणे व निश्चित करणेबाबतचा कालावधी नमूद केलेला आहे.

सदर प्रसिध्द केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकातील उन्हाळी परीक्षा २०२१ परीक्षा अर्ज भरणे व निश्चित करणेबाबतच्या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.

Also, Check Here: MSBTE Result

Msbte-Exam-Schedule

MSBTE Summer 2021 Form Filling Schedule

Summer 2021 Exam form filling Schedule
Summer 2021 exam form will be made available for Even semester and Yearly pattern Regular &
backlog students, Odd Semester backlog students
S.N. Activities Filling Examination forms
(Normal Fees)
Filling Examination forms

(With Exam form fees + Late fees of Rs. 200/-)

1 Candidate fill 03 —12 May, 2021 14 — 17 May, 2021
2 Institute fill & Confirmation 03 — 13 May, 2021 14 — 18 May, 2021
3 RBTE Confirmation 19-21 May, 2021
The last date of exam form confirmation by RBTE is 21 May, 2021 upto 4:00 PM
तरी या परिपत्रकाद्वारे विद्यार्थी, संस्था व विभागीय कार्यालय यांना उन्हाळी २०२१ परीक्षा अर्ज भरणे व निश्चित करण्याकरीता महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.

अ) उन्हाळी परीक्षा २०२१ परीक्षा अर्ज भरतांना विद्यार्थ्याकरीता सुचना.

१. विद्याथ्र्यांना परीक्षा अर्ज Candidate Login मध्ये उपलब्ध असून त्यांनी परीक्षा अर्जात स्वतःचा अचूक मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी भरावा जेणेकरुन परीक्षाविषयक माहिती देण्याकरीता मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीचा वापर करता येईल.

२. मंडळाचे कैरी फॉरवर्ड योजने अंतर्गत प्रवेशाबाबतच्या दि. १३/०८/२०२० व दि. ०८/१२/२०२०च्या परिपत्रकानुसार ज्या विद्याथ्र्यांनी करी फॉरवर्ड Registration विभागीय कार्यालयामार्फत निश्चित केले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुढील सत्र वर्षाकरीताचे नियमित परीक्षा अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

३. ज्या विद्याथ्र्यांच या पूर्वीच्या परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार / कॉपीकेस बाबतची शिक्षा पूर्ण झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा २०२१ करीता परीक्षा अर्ज भरण्याकरीता आपल्या संस्थेशी संपर्क करावा.

४. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरतांना विशेष काळजी घेऊन Optional / Elective विषयाची निवड करावी. विद्यार्थ्यांनी ज्या Optional/ Elective विषयाचे सत्रकर्म (Term Work) पूर्ण केले आहे असाच विषय परीक्षा अर्जात नमूद करावा.

५. वरील नमूद केलेल्या विहित कालावधीत परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. परीक्षा अर्ज भरतांना काही अडचण निर्माण झाल्यास त्वरीत संस्थेशी संपर्क साधावा.

६. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरणेकरीता संस्थेशी संपर्क साधून ऑनलाईन अथवा प्रचलित पद्धतीने संस्थेमध्ये शुल्क अदा करावे व संस्थेने आपला परीक्षा अर्ज निश्चित केला आहे याची खात्री करून घ्यावी.

७. बंद असलेल्या संस्थेतील पात्र विद्याथ्र्यांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून उन्हाळी २०२१ परीक्षा अर्ज भरण्याची व निश्चित करण्याबाबतची कार्यवाही मंडळाने नमूद केलेल्या विहित कालावधीतच करावी.

ब) विद्यार्थ्यांचे उन्हाळी २०२१ परीक्षा अर्ज निश्चित करण्याबाबतच्या संस्थांकरीता सूचना.

१. संस्थांनी विद्याथ्र्यांचे उन्हाळी २०२१ परीक्षेकरीता पात्रता प्रमाणपत्राकरीता आवश्यक असलेले कागदपत्रानुसार पात्रता प्रमाणपत्र Institute login मधून भरावे व विभागीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व शुल्क जमा करून पात्रता प्रमाणपत्र निश्चित करुन घ्यावे. तद्नंतर निश्चित केलेल्या पात्रता प्रमाणपत्रानुसार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज उपलब्ध करण्यात येतील.

२. संस्थांनी अभ्यासक्रम निहाय देण्यात आलेल्या Optional / Elective विषयाबाबत माहिती घेऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जात नमूद केलेले Optional / Elective विषय तपासावे व परीक्षा अर्ज निश्चित करावे.

३. ज्या विद्याथ्र्यांची या पूर्वीच्या परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार / कॉपीकेस बाबतची शिक्षा पूर्ण झाली आहे अशा विद्याथ्र्यांचे परीक्षा अर्ज Institute Login मध्ये उपलब्ध असतील. संस्थेने संबंधीत विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेचे निकाल Gazette नुसार तपासून त्याप्रमाणे अनुत्तीर्ण विषय नमुद करुन परीक्षा अर्ज निश्चित करावा.

४. ज्या विद्यार्थ्यांनी C/E या स्कीममध्ये एकवेळ संधीचा (OTO) लाभ घेऊन अंतिम वर्षातील पाचवे व सहावे सत्राचे सत्रकर्म पूर्ण केले आहे व असे विद्यार्थी उन्हाळी २०२१ परीक्षाकरीता अंतिम वर्षांसाठी पात्र आहेत. अशा विद्यार्थ्यांचे पाचवे व सहावे सत्राचे परीक्षा अर्ज उपलब्ध करुन देण्याकरीता प्राचार्यांनी संस्थेच्या लेटर हेडवर विद्यार्थ्यांनी मंडळाच्या परीक्षाविषयक नियमावलीनुसार अंतिम वर्षातील पाचवे व सहावे सत्राचे सत्रकर्म पूर्ण केले आहे व त्यांचे अंतर्गत गुण (TW व SW) संबंधित विभागास जतन केले आहे” असे प्रमाणित करून विभागीय कार्यालय व Message System द्वारे मंडळास कळविणे आवश्यक आहे. तद्नंतरच एकवेळ संधीचा (OTO) लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज उपलब्ध होतील.

५. संस्थांनी विद्याथ्र्यांना परीक्षा अर्ज भरतांना काही अडचणी आल्यास त्याबाबतचे मार्गदर्शन करावे. तसेच परीक्षा अर्जासंदर्भात संस्थेस काही अडचणी आल्यास मंडळाशी संपर्क करण्याकरीता Message System चा वापर करावा.

६. पात्र विद्याथ्र्यांनी भरलेले सर्व परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क तपासून Institute Login मधून परीक्षा अर्ज निश्चित करावेत व विहित कालावधीमध्ये विभागीय कार्यालयात परीक्षा शुल्क जमा करुन पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज निश्चित करुन घ्यावे.

७. संस्थांनी परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज निश्चित केल्याची खात्री करून उन्हाळी परीक्षा २०२१ करीता एकही पात्र विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिला नसल्याबाबतचे हमीपत्र (Undertaking) विभागीय कार्यालयास परीक्षा अर्ज निश्चित करतांना सादर करावे.

८. उन्हाळी परीक्षा २०२१ करीता परीक्षा अर्ज निश्चित केलेल्या सर्व विद्याथ्र्यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी तपासून अभ्यासक्रमनिहाय संस्थेत नोंद ठेवल्याबाबतचे प्रमाणपत्र विभागीय कार्यालयास सादर करावे. क) उन्हाळी २०२१ परीक्षा अर्ज निश्चित करण्यासंदर्भात विभागीय कार्यालयाकरीता सूचना.

१. पात्रता प्रमाणपत्राकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे तपासून त्यानुसार शुल्क घेऊन पात्रता प्रमाणपत्रे निश्चित करावीत,

२. कोव्हिड १९ प्रदुर्भाव विचारात घेता आपल्या विभागातील सर्व संस्थांना परीक्षा अर्ज निश्चित करण्याकरीता योग्य त्या सूचना द्याव्या व संस्थांना परीक्षा अर्जाबाबत काही अडचणी असल्यास मार्गदर्शन करावे.

३. बंद असलेल्या संस्थेतील विद्याथ्र्यांनी उन्हाळी २०२१ परिक्षा अर्ज निश्चित करतांना विद्याथ्र्यांचे मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी यांची नोंद विभागीय कार्यालयात ठेवावी व परीक्षासंदर्भात विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. ४. संस्थांनी सादर केलेले हमीपत्र प्रमाणपत्र व परीक्षा शुल्क इत्यादी तपासून मंडळाने नमूद केलेल्या कालावधीतच सर्व संस्थेतील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षाअर्ज निश्चित करावेत.

वरील नमूद दिनांकानुसार संस्थांनी विभागीय कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार उन्हाळी २०२१ परीक्षेचे अर्ज विभागीय कार्यालयांत निश्चित करावेत. तसेच नमूद कालावधीत संस्थेकडून उन्हाळी २०२१ परीक्षेचे अर्ज निश्चित न झाल्यास विद्याथ्र्यांच्या होणान्या शैक्षणिक नुकसाना करीता सर्वस्वी संस्था जबाबदार राहील, याची नोंद घावी.

Download MSBTE Summer 2021 Exam form Schedule: Click Here

MSBTE Hall Ticket 2021

MSBTE Time Table 2021

1 thought on “MSBTE Notification 2021 (OUT) Check Exam Fee Summer Schedule, Exam Date”

Comments are closed.